सानपाड्यात हुक्का पार्लरवर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सानपाड्यात हुक्का पार्लरवर छापा
सानपाड्यात हुक्का पार्लरवर छापा

सानपाड्यात हुक्का पार्लरवर छापा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : सानपाडा सेक्टर-३१ ए मधील मेरेडीअन सेंटर इमारतीतील १४ व्या मजल्यावर रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर सुरू असलेल्या ९ टंकी हुक्का पार्लरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास छापा मारत १० ग्राहक, तसेच मॅनेजर, वेटर व इतर ७ जण अशा एकूण १७ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.