युटीएस अ‍ॅपला प्रवाशांची पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युटीएस अ‍ॅपला प्रवाशांची पसंती
युटीएस अ‍ॅपला प्रवाशांची पसंती

युटीएस अ‍ॅपला प्रवाशांची पसंती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यूटीएस मोबाईल अ‍ॅप लोकप्रिय करण्यासाठी अनेक उपाय राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी मोबाईल तिकिटाकडे कल वाढविला आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मोबाईल तिकीट काढण्याच्या प्रमाणात दुप्पट वाढ नोंदवण्यात आली आहे.

तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएमसोबतच मोबाईल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला आहे. मात्र, कोरोनानंतर प्रथमच गेल्या सहा महिन्यांत यूटीएस ॲपद्वारे तिकीट काढण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवाशांकडून यूटीएस ॲपचा वापर हळूहळू वाढला आहे. या ॲपद्वारे खरेदी केलेल्या दैनंदिन सरासरी तिकिटांनी मार्च २०२२ मधील ३६ हजारांवरून सप्टेंबर २०२२ मध्ये ७४ हजारांचा टप्पा पार केला. यूटीएस ॲपद्वारे जारी केलेल्या तिकिटांचे योगदान मार्च २०२२ मध्ये ४.८० टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये ७.८५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

दैनंदिन प्रवाशांतही भरीव वाढ
दैनिक सरासरी प्रवासी मार्च २०२२ मध्ये २.१७ लाखांवरून सप्टेंबरमध्ये ४.२३ लाख असे दुप्पट झाले आहे. प्रवाशांची टक्केवारी मार्च २०२२ मधील ६.७२ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये १०.८५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली आहे.