पप्पू कालानी यांच्या भावाची ४१ लाखाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पप्पू कालानी यांच्या भावाची ४१ लाखाची फसवणूक
पप्पू कालानी यांच्या भावाची ४१ लाखाची फसवणूक

पप्पू कालानी यांच्या भावाची ४१ लाखाची फसवणूक

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) ः माजी आमदार पप्पू कालानी यांचे मोठे बंधू नारायण कालानी यांची त्यांच्या नोकराने टॅक्स आणि जीएसटीच्या ४१ लाख रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात नोकराच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण कालानी यांचे कॅम्प नंबर-३ मध्ये सीमा इंटरनॅशनल हॉटेल आहे. कृष्णकांत फुलपारथी हा नोकर नारायण कालानी यांचे आर्थिक व्यवहार हाताळत होता. कालानी यांनी कृष्णकांत यांच्याकडे ३ ऑक्टोबर २०२० ते १८ ऑगस्ट २०२२ दरम्यान हॉटेलचा टॅक्स आणि जीएसटी भरण्यासाठी ॲक्सिस आणि कॅनरा बँकेचे ४० लाख ९७ हजार ३८५ रुपयांचे धनादेश दिले होते. मात्र कृष्णकांतने हे धनादेश स्वतःच्या आणि मित्राच्या नावावर वटवून अपहार केला. हा प्रकार नारायण कालानी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात कृष्णकांत फुलपारथी याच्याविरोधात तक्रार दाखल केली. कृष्णकांत हा फरारी असून या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहेत.