ठाणेकरांचा अभिमान अधिक दृढ कसा होईल, त्या पध्दतीने काम करावे लागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणेकरांचा अभिमान अधिक दृढ कसा होईल, त्या पध्दतीने काम करावे लागणार
ठाणेकरांचा अभिमान अधिक दृढ कसा होईल, त्या पध्दतीने काम करावे लागणार

ठाणेकरांचा अभिमान अधिक दृढ कसा होईल, त्या पध्दतीने काम करावे लागणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३० ः ठाणे हे पारंपरिक शहर आहे. ठाणेकरांच्या मनात ठाण्याबद्दल अभिमान निर्माण करण्याची गरज पडणार नसून किंबहुना त्यांच्या मनात असलेला हा अभिमान अधिक दृढ कसा होईल, अशा पद्धतीने काम करावे लागणार असल्याचे मत नवनिर्वाचित ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्री हे देखील ठाणे शहराचे असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास अधिक गतिमान करता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वाहतुकीची समस्या ही इतर शहरांतदेखील आहे, ठाण्यात ती आहे, बॉटल नेक असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी असे बॉटल नेक शोधून त्यावर टप्प्याटप्प्याने कसा मार्ग काढता येईल किंवा पर्याय शोधता येईल याचा अभ्यास केला जाणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. तसेच शहराचा विकास हा टप्प्याटप्प्याने होत गेला आहे. त्यामुळे ठाणे शहर माझ्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण शहर असून यामध्ये काही संधी तर काही आव्हाने आहेत. प्रत्येक शहरात विविध आव्हाने असतात, ही आव्हाने आणि संधी यांची एकत्रित सांगड घालून काम करणे गरजेचे आहे. शहराच्या दृष्टीने जी आव्हाने असतील ती सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वृक्ष लागवडीचा वेगळा प्रयोग ठाण्यातही करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. शहरात छोटे-छोटे पॉकेट हे अर्बन फॉरेस्ट म्हणून विकसित करणे अपेक्षित आहे. देशी प्रजातीची वृक्ष लागवड करणे अपेक्षित असल्याचेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.