रोड अपघातातील मृत तरुणाच्या कुंटूबियांना १०.७१ लाखाची भरपाई ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोड अपघातातील मृत तरुणाच्या कुंटूबियांना १०.७१ लाखाची भरपाई !
रोड अपघातातील मृत तरुणाच्या कुंटूबियांना १०.७१ लाखाची भरपाई !

रोड अपघातातील मृत तरुणाच्या कुंटूबियांना १०.७१ लाखाची भरपाई !

sakal_logo
By

ठाणे, ता. ३० (बातमीदार) ः रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या १९ वर्षीय तरुणाच्या आई आणि बहिणीने मोटार अपघात प्राधिकरणाकडे केलेल्या दाव्यात प्राधिकरण सदस्य एच. एम. भोसले यांनी १० लाख ७१ हजार रुपयांची भरपाई बसमालक आणि ओरियंटल इन्शुरन्स कंपनी यांनी संयुक्तरित्या दावा दाखल झाल्यापासून ८ टक्के व्याजाने देण्याचा निकाल दिला. या खटल्यात दावेदाराचे वकील यु. आर. विश्वकर्मा आणि इन्शुरन्स कंपनीचे वकील एस. एस. गायकवाड यांनी युक्तिवाद केला.

१९ वर्षीय तरुण अमन खान याचा २८ सप्टेंबर २०२० मध्ये दुचाकीने कल्याणकडे येताना हॉटेल ग्रीन स्पायसी येथे अपघातात मृत्यू झाला होता. अमनच्या दुचाकीला भरधाव बसने धडक दिली होती. उपचारादरम्यान अमनचा मृत्यू झाला. अमन हा ऑटो फिल्डमध्ये काम करीत होता. त्याला महिन्याला १२ हजार मासिक वेतन होते. अमनवर त्याची आई अर्रफना खान (वय ३४) आणि बहीण फिझा (वय १५) हे अवलंबून होते. खान कुटुंब भिवंडी तालुक्यातील बोरिवली पडघा परिसरात राहत होते, अशी माहिती दावेदार पक्षाचे वकील यु. आर. विश्वकर्मा यांनी मोटार प्राधिकरणाला दिली. मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य एच. एम. भोसले यांनी प्राधिकरणासमोरचे साक्षी आणि पुरावे, कागदपत्रांचा दस्तावेज पाहून मृतकाच्या कुटुंबीयांना १० लाख ७१ हजारांची भरपाई देण्याचा निर्णय दिला.