छगन भुजबळ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छगन भुजबळ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
छगन भुजबळ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

छगन भुजबळ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

sakal_logo
By

मालाड, ता. ३० (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबाबत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील ३६ विधानसभा परिसरातील विविध पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. ही हिंदूंच्या श्रद्धेची चेष्टा असून ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे युवा मोर्चा मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना, गेल्या दोन वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला, हिंदूंच्या सणांवर बंदी घातली, मात्र आता महाराष्ट्रात हिंदुत्वाचीच राजवट आहे आणि आमच्या श्रद्धेवर घाला घालणारी अशी कृत्ये युवा मोर्चा खपवून घेणार नाही. पोलिस गुन्हा नोंदवून कारवाई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.