आजपासून टॅक्सी भाडेवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून टॅक्सी भाडेवाढ
आजपासून टॅक्सी भाडेवाढ

आजपासून टॅक्सी भाडेवाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : राज्य सरकारने नुकतीच रिक्षा, टॅक्सी आणि कुल कॅब वाहनांना भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. उद्यापासून (ता. १) नवीन भाडे मुंबई महानगरात लागू करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी चालकांना आपल्या वाहनांच्या इलेट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेशन करण्याची गरज आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांनी नवीन भाडे कसे द्यायचे, असा प्रश्न नागरिकांना उद्भवू नये, यासाठी परिवहन विभागाने टेरिफ कार्ड जारी केले आहे. त्यावर किमान भाड्यासह पुढील दर किलोमीटरनुसार भाड्याची माहिती देण्यात आली आहे.

सीएनजी काळी-पिवळी टॅक्सीसाठी नागरिकांना किमान भाडे आता २८ रुपये द्यावे लागणार आहे; तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८.६६ रुपये मोजावे लागणार आहेत. रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नियमित भाड्याच्या २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे. वातानुकूलित काळी- पिवळ्या टॅक्सीचे भाडे १० टक्के जास्त आकारले जाणार आहे, तर ऑटोरिक्षाचे किमान भाडे २३ रुपये करण्यात आले आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १५.३३ रुपये आकारले जाणार आहे. रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे.

बारकोडची सुविधा
परिवहन विभागाने जारी केलेले टॅक्सी, रिक्षाचे टेरिफ कार्डला बनावट पद्धतीने वापर करून प्रवाशांची आर्थिक लूट करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी परिवहन विभागाने जारी केलेल्या टेरिफ कार्डवर बारकोड सुविधा देण्यात आली आहे. त्या बारकोडला मोबाईलद्वारे स्कॅन केल्यास टेरिफ कार्ड अधिकृत की बनावट, यासंदर्भातील माहिती प्रवाशांना त्वरित मिळवता येणार आहे.