Dasara Melava: ठाकरेंच्या मेळाव्याला राष्ट्रवादीची मदत - कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Melava: ठाकरेंच्या मेळाव्याला राष्ट्रवादीची मदत - कदम
ठाकरेंच्या मेळाव्याला राष्ट्रवादीची मदत - कदम

Dasara Melava: ठाकरेंच्या मेळाव्याला राष्ट्रवादीची मदत - कदम

sakal_logo
By

मुंबई: शिवाजी पार्क येथे मेळाव्याला गर्दी जमावी म्हणून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. मैदान भरावे म्हणून काँग्रेसकडे मदत मागितली जात आहे. हे सत्य पेंग्विन सेना सांगणार का, असा प्रश्न कदम यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

दसरा मेळावा एकाचवेळी दादर शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे आयोजित करण्यात येत आहे.  या मेळाव्यास कोणी किती गर्दी जमवणार अशी स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी गर्दीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

शिवाजी पार्कच्या मैदानात गर्दी जमावी म्हणून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मागितली असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर प्रत्युत्तर देत आपली बाजू मांडली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्ट्रो म्हणाले की, बिकेसीतील मेळावा हा शिंदे गटाचा नसून भाजपचा दसरा मेळावा आहे.