मुरबाड ग्रामीण रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

sakal_logo
By

सरळगाव, ता. १ (बातमीदार) ः महिलांचे आरोग्य हे त्यांच्या हिमोग्लोबिनवर अवलंबून असते. त्यासाठी महिलांनी नियमितपणे हिमोग्लोबिन तपासणी केली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी केले. मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेक आजारांना महिला बळी पडत आहेत. महिलांचे आरोग्य चांगले असेल, तर त्या कुटुंबाचेही आरोग्य उत्तम राहाते. यासाठी मी दोन वर्षांपूर्वी मतदारसंघात एक लाख महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी उद्दिष्ट ठेवून तपासणी व उपचार शिबिरे राबवली होती. या मोहिमेला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. आता शासनाच्या वतीने हे अभियान राबवले जात आहे. याचा फायदा महिलांनी घ्यावा.
या कार्यक्रमाला खासकरून उपस्थित असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी उपस्थित महिलांना शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या माता-बाल संगोपनासंबंधी विविध योजनांची माहिती दिली. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसाद भंडारी यांनी महिला व बालकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा, शस्त्रक्रिया आणि उपचार यांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुभाष पवार, नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, इंदवी तुळपुळे, डॉ. जयवंती ठमके, डॉ. स्वप्नील वाघचौरे, नीलेश लोंढे उपस्थित होते.