सार्वजनिक वाचनालयाचा अभिनव उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक वाचनालयाचा अभिनव उपक्रम
सार्वजनिक वाचनालयाचा अभिनव उपक्रम

सार्वजनिक वाचनालयाचा अभिनव उपक्रम

sakal_logo
By

कल्याण, ता. १ (बातमीदार) : अवांतर वाचन ही काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढीला वाचन समृद्ध करायचे असल्यास त्या पिढीवर विद्यार्थिदशेतच वाचन संस्कार रुजवणे समाजाचेही उत्तरदायित्व आहे. त्यासाठी सार्वजनिक वाचनालय कल्याणने अग्रगण्य भूमिका घेण्याचे ठरविले आहे. जेणेकरून भावी पिढीतून वाचक वर्ग उदयास येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आत्मिक व बौद्धिक विकास होईल.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून सार्वजनिक वाचनालय कल्याणने ‘वाचनालय विद्यार्थ्यांच्या भेटीला’ हा अभिनव उपक्रम करण्याचे योजिले आहे. हा वाचन सप्ताह कल्याणमधील काही शाळांमधून राबविण्यात येणार आहे. वाचनाचे महत्त्‍व सांगून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न वाचनालयातील ग्रंथसेविका करणार आहेत. या उपक्रमात पहिल्या प्रयत्नांत सुभेदार वाडा हायस्कूल, शारदा मंदिर हायस्कूल, शशांक विद्यालय, गजानन विद्यालय, ओक हायस्कूल या शाळांचा समावेश असून वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर व शशांक विद्यालयाच्या मुग्धा घाटे, सहग्रंथपाल करुणा कल्याणकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक वाचनालय सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी दिली.