वासिंद -अंबाडी बस सेवा पुन्हा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासिंद -अंबाडी बस सेवा पुन्हा सुरू
वासिंद -अंबाडी बस सेवा पुन्हा सुरू

वासिंद -अंबाडी बस सेवा पुन्हा सुरू

sakal_logo
By

वासिंद, ता. १ (बातमीदार) ः कोरोना काळात गेली दोन वर्षे बंद असलेली वासिंद -अंबाडी ही बससेवा गुरुवारी (ता. २९) पुन्हा सरू करण्यात आली. ही बससेवा बंद असल्याने खंबाळा ते वासिंद दरम्यानच्या अनेक गावातील विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार व गावकऱ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. यावर प्रवासी संघटनेने भिवंडी डेपोकडे बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. यानुसार गुरुवार (ता. २९) पासून एक फेरी सुरू करण्यात आली. या वेळी बसचे वाहक, चालक यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कामगार नेते व प्रवासी संघटना नेते डॉ. मनोहर सासे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या वेळी शांताराम ठाकरे, आत्माराम पाटील, बबन भाकरे, शांताराम पाटील, अनिल शेलार, बाळा सोगळे, मिलिंद दिनकर व विद्यार्थी आदी उपस्थित होते. बससेवा अखंडितपणे सुरू राहावी, प्रवासी नागरिक व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी मुकेश दामोदरे यांनी केले.