भिवंडीत ७२ हजार वृक्षारोपणाचा अभिनव कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत ७२ हजार वृक्षारोपणाचा अभिनव कार्यक्रम
भिवंडीत ७२ हजार वृक्षारोपणाचा अभिनव कार्यक्रम

भिवंडीत ७२ हजार वृक्षारोपणाचा अभिनव कार्यक्रम

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कल्पनेतून भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात एकाच दिवशी रविवारी (ता. २) सुमारे ७२ हजार वृक्षारोपण करण्याचा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम वाशेरे येथे होत असून, तेथ पाच हजार रोपे लावण्यात येतील. राज्यात प्रथमच भिवंडी मतदारसंघात हा उपक्रम होत आहे. या उपक्रमाचे कौतुक करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघातही ७२ हजार वृक्षारोपण करण्याची सूचना केली होती. त्यानुसार राज्यातील इतर भागांतही वृक्षारोपण केले जाणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी होत आहे. भिवंडी तालुक्यातील वाशेरे येथे ५ हजार वृक्षारोपण केले जाणार असून, मतदारसंघातील ३५० गावांमध्ये उर्वरित ६७ हजार वृक्षारोपण केले जाईल, असे मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.