विद्यापीठाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा दिवाळीनंतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा दिवाळीनंतर
विद्यापीठाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा दिवाळीनंतर

विद्यापीठाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा दिवाळीनंतर

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १ (बातमीदार) ः मुंबई विद्यापीठाच्या पाचव्या सत्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा १३ ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. मात्र या परीक्षा आता दिवाळीनंतर घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी दिली.
मागील सत्राच्या परीक्षा उशिरा झाल्याने पाचव्या सत्राच्या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. किमान एक महिना परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी रुपारेल, एमडी, नॅशनल, विकास, रिझवी या पाच महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी पत्राद्वारे विद्यापीठाकडे केली होती; परंतु विद्यापीठाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती प्राध्यापकांनी दिली. याबाबत युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला. मागील सत्राच्या परीक्षांना ९० दिवसही पुरे झाले नसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक आहे, असे अधिसभेचे माजी अध्यक्ष प्रदीप सावंत यांनी सांगितले. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागणीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.