शहापुरात जांभूळवाड ग्राप वर शिवसेनेचा बिनविरोध। सरपंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात जांभूळवाड ग्राप वर शिवसेनेचा  बिनविरोध। सरपंच
शहापुरात जांभूळवाड ग्राप वर शिवसेनेचा बिनविरोध। सरपंच

शहापुरात जांभूळवाड ग्राप वर शिवसेनेचा बिनविरोध। सरपंच

sakal_logo
By

खर्डी, ता. १ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात ७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता १६ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जांभूळवाड ग्रामपंचायतीत शिवसेनेने सरपंचांसहित सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. शहापूर तालुक्यातील जांभूळवड ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आणून मुहूर्ताचा नारळ फोडला आहे. सरपंचपदी जना मंगल भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर पद्माकर धोबी, सोनाली हंबीर, लक्ष्मी थोराड, महादू वाघ, नंदा चौधरी हे बिनविरोध निवडून आले आहेत. यासाठी जिल्‍हा परिषद सदस्य राजेश विशे, बाळा धानके, पद्माकर वेखंडे, रवी लकडे, दीपक लकडे यांनी प्रयत्न केले.