मालामडमध्ये महिलेला श्‍वानदंश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालामडमध्ये महिलेला श्‍वानदंश
मालामडमध्ये महिलेला श्‍वानदंश

मालामडमध्ये महिलेला श्‍वानदंश

sakal_logo
By

मालाड, ता. १ (बातमीदार) : मालवणी गेट क्रमांक ३ येथे भटक्या श्‍वानाने महिलेच्या पायाचा चावा घेत जखमी केले. परिसरातील किरण अपार्टमेंटच्या मागील भागात एक महिला या भटक्या श्‍वानांना अन्न देते, त्यामुळे येथे अनेक भटके श्‍वान आहेत. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्यांवर ते भुंकत असतात, असे रहिवाशांनी सांगितले. येथून कामानिमित्ताने जाणारी महिला शैला राजेंद्र कोळंबेकर यांना भटक्या श्‍वानाने उजव्या पायाचा चावा घेतला. या श्‍वानांमुळे रस्त्याने रहदारी करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत पालिकेच्या मदत केंद्रावर तक्रार केली आहे. मात्र कारवाई होत नसल्याचे सांगण्यात आले.