५ जी मुळे विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार : मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५ जी मुळे विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार : मुख्यमंत्री
५ जी मुळे विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार : मुख्यमंत्री

५ जी मुळे विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार : मुख्यमंत्री

sakal_logo
By

कामोठे, ता. १ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी केंद्र सरकार अंतर्गत रिलायन्स जिओ टेलिकॉम यांच्या संयुक्त विद्यमाने ५-जी सेवा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पनवेलमध्ये पोदी येथील पनवेल महापालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेतून ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शालेय आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ यांच्यासह भाजप व शिवसेना शिंदे गटाचे नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये डिजिटल क्रांती झाली आहे. जिओ ५-जी मुळे शिक्षण, शेती यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंदे म्हणाले. जिओ ५-जी अंतर्गत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित अभूतपूर्व दसरा मेळावा होईल, यात कुठलीच शंका नाही. आगामी काळात सर्व स्तरांतून मेळाव्याचे मूल्यमापन होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.