जिल्ह्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष
जिल्ह्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष

जिल्ह्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष

sakal_logo
By

मोखाडा, ता. १ (बातमीदार) : ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हाभरातून भाजपचे दोन सरपंच आणि १४१ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ही विजयी घोडदौड अशीच राहणार आहे. तसेच या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष राहणार असल्याचा दावा भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर निर्णायक चित्र समोर आले आहे. पालघर तालुक्यातील अक्करपट्टी ग्रामपंचायतीमधील हेमांगी हेमंत राऊत व वाडा तालुक्यातील नांदणी ग्रामपंचायतील मेघा सदाशिव खांडेकर या भाजपच्या दोन महिला सरपंच बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच वाडा तालुक्यात २७, विक्रमगडमध्ये २१, जव्हार ३७, मोखाडा ९, तलासरी ३, डहाणू २७, तर पालघर तालुक्यातून १७ असे एकूण भाजपचे १४१ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, असा दावा भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केला आहे.