पनवेलमध्ये ८० वर्षीय वृद्धाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये ८० वर्षीय वृद्धाची हत्या
पनवेलमध्ये ८० वर्षीय वृद्धाची हत्या

पनवेलमध्ये ८० वर्षीय वृद्धाची हत्या

sakal_logo
By

पनवेल, ता. १ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील पोयंजे गावात राहणाऱ्या पाडुरंग मऱ्या मते या ८० वर्षीय वृद्धावर अज्ञात मारेकऱ्याने धारदार हत्याराने वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पांडुरंग मते यांचा मृतदेह गत २६ सप्टेंबर रोजी वालीचा डोह या ओढ्यामध्ये सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पनवेल तालुका पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील मृत पांडुरंग मते यांची मुले, सुना व नातवंडे हे पनवेल तालुक्यातील पोयंजे गावात राहत आहेत, तर पांडुरंग मते हे गावाबाहेरील घरात एकटेच राहत होते. गत २६ सप्टेंबर रोजी सकाळी पांडुरंग मते यांचा मृतदेह पोयंजे गावालगतच्या वालीचा डोह या ओढ्यांमध्ये आढळून आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मते यांचा मृतदेह ताब्यात घेतला. यावरून पांडुरंग मते यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याचे, तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह वालीच्या डोहामध्ये टाकून दिल्याचे आढळून आले. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्या व पुरावा नष्ट करणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.