आगीत आईसह दोन मुली होरपळल्या आगीत आईसह दोन मुली होरपळल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगीत आईसह दोन मुली होरपळल्या
आगीत आईसह दोन मुली होरपळल्या
आगीत आईसह दोन मुली होरपळल्या आगीत आईसह दोन मुली होरपळल्या

आगीत आईसह दोन मुली होरपळल्या आगीत आईसह दोन मुली होरपळल्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १ ः डोंबिवलीतील भोपर गावात शनिवारी पहाटे एका घराला अचानक आग लागली. घरातील पाटील कुटुंब झोपेत असताना आगीने घराला पूर्ण वेढले होते. प्रल्हाद पाटील यांनी आगीतून आपल्या कुटुंबाला बाहेर काढले, मात्र यात त्यांच्या पत्नी व दोन मुली होरपळल्या आहेत. भोपर गावात प्रल्हाद पाटील यांचे कुटुंब राहत असून शनिवारी पहाटे त्यांच्या घराला आग लागली. कुटुंब गाढ झोपेत असताना घरात धूर झाल्यावर त्यांना अचानक जाग आली. घराला आग लागल्याचे समजताच तत्काळ त्यांनी आपल्या पत्नी-मुलींसह घराबाहेर धाव घेतली. आगीमध्ये प्रल्हाद पाटील यांची पत्नी प्रीती, त्यांच्या दोन मुली समीरा आणि समीक्षा गंभीर भाजल्या आहेत. गावकऱ्यांनी त्यांना लगेच डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आहे. अग्निशमन दलास आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझवण्यात आली. मानपाडा पोलिसांनीही घटनास्थळी पंचनामा करत याची चौकशी सुरू केली आहे. आग कशामुळे लागली, आग लावली की लागली, याचा तपास पोलिस करत आहेत.