घरात घुसून सोने लुटणाऱ्या फरारी महिलेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरात घुसून सोने लुटणाऱ्या फरारी महिलेला अटक
घरात घुसून सोने लुटणाऱ्या फरारी महिलेला अटक

घरात घुसून सोने लुटणाऱ्या फरारी महिलेला अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : दिवसाढवळ्या फ्लॅटमध्ये घुसून सोन्याचे दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तूंची लूट करणाऱ्या एका सराईत महिलेला मुंबईतील बोरिवली पोलिसांनी कुर्ला परिसरातून अटक केली. तिच्याकडून ८ लाख ३५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
शीतल अरुण उपाध्याय (वय ३६) असे आरोपी महिलेचे नाव असून या महिलेवर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. बोरिवलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले की, साईबाबानगर येथील दीप सोसायटीमध्ये राहणारी एक परदेशी महिला २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी आली असता ती काही जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी घराबाहेर गेली होती. विदेशी महिलेची आई अनवधानाने घराचा दरवाजा बंद न करता झोपली होती. त्या वेळी आरोपी महिलेने घरात प्रवेश करून महिलेच्या बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी त्या महिलेचा फोटो काढून तो व्हायरल केला असता फोटो असलेली महिला विनोबा भावेनगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. बोरिवली पोलिसांनी तत्काळ सापळा रचून महिलेला अटक केली.