जागतिक वन्यजीव सप्ताहाची मुंबईत सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक वन्यजीव सप्ताहाची मुंबईत सुरुवात
जागतिक वन्यजीव सप्ताहाची मुंबईत सुरुवात

जागतिक वन्यजीव सप्ताहाची मुंबईत सुरुवात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : जागतिक वन्यजीव सप्ताहाची सुरुवात मुंबईतील गोरेगावमधील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे शनिवारी (१ ऑक्टोबर) करण्यात आली. सप्ताहाची सुरुवात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमधील संवर्धन शिक्षण केंद्रात वन्यजीवांसंदर्भात चित्रफितीने झाली. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुंबईतील तसेच राज्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या चिंताजनक आहे. भटके विमुक्त श्वान धोक्यात आलेल्या वन्यजीवांची शिकार करतानाच्या घटना बऱ्याचदा समोर आल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणालासुद्धा धोका निर्माण झाला आहे. लडाखमध्ये श्वानांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे कोणत्याही परिस्थितीत आणि प्रदेशात अशा घटना होऊ शकतात, हा मुद्दा पुढे आला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींसाठी या संदर्भातील चित्रफितीचे स्क्रीनिंग आयोजित केले होते. सुमित मलिक, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज याप्रसंगी बोलून दाखवली. चित्रफितीमुळे समस्येबद्दल अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असे मत या वेळी व्यक्त केले गेले.