शहाड रेल्वे स्थानकामध्ये फलाटवर दुचाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहाड रेल्वे स्थानकामध्ये फलाटवर दुचाकी
शहाड रेल्वे स्थानकामध्ये फलाटवर दुचाकी

शहाड रेल्वे स्थानकामध्ये फलाटवर दुचाकी

sakal_logo
By

कल्याण, ता. १ (बातमीदार) ः मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकामध्ये फलाटवर एका रिक्षा चालकाने रिक्षा आणत प्रवासी वाहतूक केल्याची घटना ताजी असताना, शहाड रेल्वे स्थानकामध्ये एका दुचाकीस्वाराने दुचाकी आणल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कल्याणपुढील रेल्वे स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढल्याचे चित्र आहे.
एका महिन्यापूर्वी आंबिवली रेल्वे स्थानकावर रिक्षा चक्क फलाटावर आणल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असताना शहाड रेल्वे स्थानकात फलाटावर दुचाकीस्वाराने दुचाकी आणल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सुरक्षा यंत्रणेचा धाक उरला नसल्याचे दिसून येते. याबाबत टिटवाळा रेल्वे स्थानक सुरक्षा बल पोलिस निरीक्षक अंजली बाबर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, की रेल्वे स्थानकामध्ये वाहने आणणे हे बेकायदा असून आणल्यास कठोर कारवाई करतोच, शहाड रेल्वे स्थानक प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.