खेळाच्या मैदानाला गवताचा वेढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळाच्या मैदानाला गवताचा वेढा
खेळाच्या मैदानाला गवताचा वेढा

खेळाच्या मैदानाला गवताचा वेढा

sakal_logo
By

खारघर, ता. २ (बातमीदार) : खारघर वसाहतीतील सेक्टर सात मधील भूखंड क्रमांक ३० येथे एकमेव खेळाचे मैदान आहे. त्या ठिकाणी सध्या गवत आणि झाडेझुडपे वाढल्याने खेळण्यासाठी येणाऱ्यांची; तसेच मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. मैदानाची साफसफाई करून ते खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खारघर परिसरात सिडकोने काही ठिकाणी उद्यान तर काही ठिकाणी खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले आहे. सेक्टर सातमधील भूखंड क्र. ३० मध्ये सिडकोने ५,७३५ चौरस मीटर जागेवर खेळाचे मैदान उभारले आहे. परिसरात एकमेव खेळाचे मैदान आहे. उद्यानात जॉगिंग ट्रॅकसुद्धा बनवला आहे; परंतु मैदानात मोठ्या प्रमाणात गवत-झाडेझुडपे वाढली असून त्याला जंगलाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांची गैरसोय होत आहे. वाढलेल्या गवतामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका बळावला आहे. मैदानावर गवत व झुडपे वाढल्याने लहान मुलांना व नागरिकांना त्रास होत आहे. स्वच्छतेअभावी मैदानाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे मैदानाची साफसफाई करून ते सुस्थितीत ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पालिकेच्या उद्यान विभागात विचारणा केली असता, लवकरच गवत काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.