सावरखिंड येथे गणित कथा कथन दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरखिंड येथे गणित कथा कथन दिवस
सावरखिंड येथे गणित कथा कथन दिवस

सावरखिंड येथे गणित कथा कथन दिवस

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ३ (बातमीदार) : सावरखिंड येथे प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व जिल्हा परिषद शाळा आणि दुर्गा उत्सव मंडळातर्फे गणित कथा-कथन दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये गणिताविषयी माहिती, कथा मनोरंजक पद्धतीने मुलांना सांगण्यात आली. तसेच मुलांमध्ये गणिताची उत्सुकता वाढवणे, मुलांमधून गणिताची भीती घालवणे या हेतूने हा गणित मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांना खूप छान उत्तरे दिली. आपली मुले गणित कुठे-कुठे शिकतात, आपण घरातील साहित्याच्या आधारे मुलांना कशा प्रकारे गणिताची संकल्पना स्पष्ट करू शकतो. तसेच अनुभवाची जोड देऊन गणितीय संकल्पना आपल्या मुलांमध्ये कशा पद्धतीने रुजवता येतील, या विषयीची माहिती या कार्यक्रमातून पालकांना देण्यात आली. या मेळाव्याला उपस्थित मुख्याध्यापक रामदास जेटले, दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष कैलास कुवरा, तसेच ‘प्रथम’चे प्रतिनिधी उपस्थित होते.