कामगार कल्याण मंडळ केंद्रांत गांधी जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार कल्याण मंडळ केंद्रांत गांधी जयंती साजरी
कामगार कल्याण मंडळ केंद्रांत गांधी जयंती साजरी

कामगार कल्याण मंडळ केंद्रांत गांधी जयंती साजरी

sakal_logo
By

गोरेगाव, ता. ३ (बातमीदार) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गोरेगाव केंद्राच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि बँक ऑफ बडोदा गोरेगाव शाखेच्या स्मिता खामकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंदादीप शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन जगधने यांनी महात्मा गांधी; तर शिक्षकांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली. पद्मा नवले, दीपा कुडेकर साथीदारांनी ‘वैष्णव जन तो तेने कहिए’ भजन सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी सहायक आयुक्त सयाजी पाटील यांनी केले व आभार केंद्र संचालक नीलेश पाटील यांनी मानले.