यशवंतनगरातील ३६० कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशवंतनगरातील ३६० कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित
यशवंतनगरातील ३६० कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित

यशवंतनगरातील ३६० कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित

sakal_logo
By

जव्हार, ता. ३ (बातमीदार) ः जव्हार नगर परिषदेकडून शहरात जय सागर जलाशयाच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत असतो. यंदा मुबलक पाऊस झाल्याने जलाशयदेखील भरून ओसंडून वाहत होते. असे असतानादेखील रविवारी (ता. २) सकाळी पाच वाजता होत असलेला पाणीपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता जव्हार नगर परिषदेकडून खंडित केल्याने यशवंतनगर परिसरातील ३६० कुटुंबांचा सुट्टीच्या दिवशी पाण्याच्या गैरसोयीमुळे खेळखंडोबा झाला.
जव्हार शहराच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून खडखड धरण नळ पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे संस्थानकाळी या शहराच्या विकासाकरिता शंभर वर्षांपूर्वी जव्हार नगर परिषदेची स्थापना महाराजांनी केली होती. या सगळ्या सुखसोयी असताना नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा देणे अपेक्षित असताना नागरिकांची तक्रारीनंतर केवळ दिशाभूल चालू आहे. या सगळ्यासाठी नगर परिषदेचे प्रशासन जबाबदार असल्याचे शहरातील महिलांचे म्हणणे आहे. आजही शहराला राजे यशवंतराव मुकणे महाराज यांनी तयार केलेल्या साठ वर्षे जुन्या जयसागर जलाशयावर अवलंबून राहावे लागत आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेली यंत्रणा जुनाट झाली असून या यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी योग्यप्रकारे व्यक्तीची अजूनपर्यंत व्यवस्था न करण्यात आल्याने शहरात आजही पिण्याच्या पाण्यापासून नागरिकांचे हाल होत आहेत.

जयसागर जलाशय परिसरात पम्पिंग स्टेशनला विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणी साठवण्याची केवळ एकच टाकी भरली असल्याने पाणीपुरवठा होण्यास अडथळा झाला.
- विशाल मोरे, अभियंता, बांधकाम विभाग