भिवंडीत गांधी जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत गांधी जयंती साजरी
भिवंडीत गांधी जयंती साजरी

भिवंडीत गांधी जयंती साजरी

sakal_logo
By

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती महापालिकेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील तळमजल्यावर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, मंडई येथील महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्यास प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त (आरोग्य) दीपक झिंजाड उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारतासाठी पर्यायाने स्वच्छ भिवंडी, सुंदर भिवंडीची व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी भिवंडीतील पालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना केले असून, यापूर्वी ज्या पद्धतीने भारत स्वच्छता अभियान व महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील साफसफाईसाठी चांगल्या आयोजनाव्दारे भिवंडी शहर नावारूपाला आले आहे. त्याच पद्धतीने स्वच्छता हीच सेवा या ब्रीदवाक्यापासून स्फूर्ती घेऊन, आपण सर्वांनी भिवंडी शहरातील स्वच्छता व प्लास्‍टिक कचऱ्याच्या निर्मूलनासाठी अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत रहाणे काळाची गरज असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.