स्वच्छता अभियान राबवून गांधी जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता अभियान राबवून गांधी जयंती साजरी
स्वच्छता अभियान राबवून गांधी जयंती साजरी

स्वच्छता अभियान राबवून गांधी जयंती साजरी

sakal_logo
By

मनोर, ता. ३ (बातमीदार) : मनोर वनपरिक्षेत्र कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती साजरी करण्यात आली. रविवारी सकाळी मनोर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल रवींद्र केळुस्कर यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्षहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबवून वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी नांदगावचे वनपाल अविनाश सरगर, शिपाई कांचन वळवी, जागुती गुरोडा, शैलेश, गांगोडा आणि तेजस सुतार आदी उपस्थित होते.