बंगालच्या माॅं दुर्गेचे नवी मुंबईकरांना दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंगालच्या माॅं दुर्गेचे नवी मुंबईकरांना दर्शन
बंगालच्या माॅं दुर्गेचे नवी मुंबईकरांना दर्शन

बंगालच्या माॅं दुर्गेचे नवी मुंबईकरांना दर्शन

sakal_logo
By

जुईनगर, ता.३ (बातमीदार) ः कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे नवरात्रोत्सवात वेगवेगळ्या संकल्पना राबण्यावर सार्वजनिक मंडळांनी भर दिला आहे. या सणाला बंगालमध्येदेखील विशेष महत्त्व असल्याने नवी मुंबईतील बंगाली नागरिकांच्यावतीने वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मॉं दुर्गेची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
नवी मुंबई बंगाली असोसिएशनतर्फे वाशी येथील शारदोत्सव साजरा केला जात आहे. देवी प्रतिष्ठापना करण्याचे ४३ वे वर्ष असून यानिमित्ताने मानवतेचे जतन करण्याचा संदेश देणारी सजावट करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणस्नेही अशी मोल्डेड फोम कोरीव कामाने सुशोभित केलेली १६ फुटांची मूर्ती साकारण्यात आली आहे. याशिवाय भाविकांना मिश्र भाज्यांची खिचडी भाजा, मिष्टी आणि चटणीचा विशेष भोग सुपारीच्या पानांपासून तयार ताटांमध्ये दिला जात असल्याने बंगालच्या परंपरेची अनुभूती नवी मुंबईकरांना होत आहे.
---------------------------------------------------
मनोरंजनासाठी संगीत, फॅशन शो
दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी विविध पदार्थांचे स्टॉल येथे आहेत. याचबरोबर मनोरंजनासाठी संगीत व फॅशन शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यात बंगालमधील लोकप्रिय कलाकार दुर्निबर साहा, इमॉन चॅटर्जी व मेखला दासगुप्ता यांच्यासह प्रसिद्ध अशा आंगिक डान्स अकॅडेमीचा देखील समावेश आहे.