पालघर येथे ज्येष्ठ नागुरिक दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर येथे ज्येष्ठ नागुरिक दिन साजरा
पालघर येथे ज्येष्ठ नागुरिक दिन साजरा

पालघर येथे ज्येष्ठ नागुरिक दिन साजरा

sakal_logo
By

पालघर, ता. ३ (बातमीदार) ः पालघर येथील सहआयुक्त समाज कल्याण, सीनियर सिटीजन असोसिएशन, विसावा, वासल्य ज्येष्ठ नागरिक संघ व ममता ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. येथील विठ्ठल मंदिर सभागृहात सीनियर सिटीजनचे अध्यक्ष फणींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात ज्येष्ठ नागरिकांच्या तपासण्या करून पुढील उपचार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे व पत्रकार नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दीपक पटाडे यांनी, ज्येष्ठ नागरिकांना विविध व्याधीचा सामना करावा लागतो. या काळात उद्भवणारे विविध रोग व आरोग्याच्या समस्या याविषयीचे मार्गदर्शन व उपाययोजना याविषयीची माहिती दिली. यावेळी वात्सल्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण पाध्ये, फणींद्र पाटील, भगवान पामाळे आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. आरोग्य शिबिरासाठी ढवळे मेमोरियल हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. मनोहर पाटील यांनी आभार मानले.