एसएसटी महाविद्यालयातर्फे स्वच्छतेचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसएसटी महाविद्यालयातर्फे स्वच्छतेचा संदेश
एसएसटी महाविद्यालयातर्फे स्वच्छतेचा संदेश

एसएसटी महाविद्यालयातर्फे स्वच्छतेचा संदेश

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) ः सातत्याने विविध लोकोपयोगी संदेशांचे उपक्रम राबवणाऱ्या उल्हासनगरातील एसएसटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंती निमित्त रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला. यामध्ये महात्मा गांधी यांची वेशभूषा केलेल्या एका विद्यार्थ्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. त्यानंतर व्हिनस चौकापासून ते कॉलेजपर्यंत रॅली काढून स्वच्छतेच्या संदेशाद्वारे आणि घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांच्या संकल्पनेतून प्लास्टिकमुक्तीसाठी नवीन अभियान सुरू करण्यात आले. उपप्राचार्य तसेच एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा. जीवन विचारे यांनीही स्वच्छतेविषयी विचार मांडले. तसेच कॉलेजतर्फे राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपप्राचार्य प्रा. दीपक गवादे यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी यांनी महात्मा गांधीजी यांच्या विचारांचे आपण दैनंदिन जीवनामध्ये आचरण केले पाहिजे, असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि उद्योजकतेचे धडे देण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खादी कपड्यांचा स्टॉल तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. तुषार वाकसे, प्रा. मयूर माथूर, प्रा. अनिल तेलिंगे, प्रा. नम्रता सिंग यांनी परिश्रम घेतले.