दहा ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध
दहा ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध

दहा ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध

sakal_logo
By

मुरबाड, ता. ३ (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यात निवडणूक जाहीर झालेल्या ३५ पैकी १० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज शिल्लक राहिल्याने या गावातील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत; तर तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज नसल्याने सरपंच पदे रिक्त राहणार आहेत.
वडवली व उमरोली खुर्द या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. आंबेले खुर्द ग्रामपंचायत सदस्य पदासाठी फक्त एक अर्ज दाखल झाला आहे. उर्वरित सहा जागा रिक्त राहणार असल्याने या ठिकाणी निवडणुका होणार नाहीत. उर्वरित ३२ पैकी वेळूक, खेवारे, पवाळे, साखरे, नांदगाव, दहिगाव, चाफे या सहा ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांनी स्थानिक पातळीवर विचारविनिमय करून सर्व सदस्य पदासाठी फक्त एक अर्ज शिल्लक ठेवल्याने सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
मुरबाड तालुक्यात दहीगाव चाफे, इंदे, किसल, नांदगाव, पवाळे, साखरे, शेलगाव, उंब्रोली बुद्रुक, वेळूक, खेवारे या दहा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज शिल्लक राहिल्याने या गावातील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच वेळूक, खेवारे, पवाळे, साखरे, नांदगाव, दहिगाव चाफे या सहा गावांतील सर्व सदस्यसुद्धा बिनविरोध निवडून आले आहेत.