डोंबिवली येथे हातमाग कपड्यांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवली येथे हातमाग कपड्यांचे प्रदर्शन
डोंबिवली येथे हातमाग कपड्यांचे प्रदर्शन

डोंबिवली येथे हातमाग कपड्यांचे प्रदर्शन

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ३ (बातमीदार) ः सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग व यंत्रमाग कपड्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन डोंबिवली येथे नुकतेच करण्यात आले. ५ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. हातमाग, वीणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगल्या दर्जाचे असते. त्यामुळे हातमाग कापड प्रदर्शनाचा डोंबिवलीकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदर्शनाचे प्रमुख योगेश पोतन यांनी केले. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या कॉटन साड्या, इरकली साड्या, सोलापूर सुप्रसिद्ध चादर, डबल बेडशीट, रजाई, पंचा, टॉवेल, सतरंजी, पायजमा, कुर्ता असे विविध प्रकारचे कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. विक्रीवर २० टक्के सूट ठेवण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.