जव्हार फाटा येथे नागाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हार फाटा येथे नागाला जीवदान
जव्हार फाटा येथे नागाला जीवदान

जव्हार फाटा येथे नागाला जीवदान

sakal_logo
By

मनोर, ता. ३ ः मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या जव्हार फाट्यावरील मनोर-विक्रमगड रस्त्यावरच्या भंगार विक्रेत्याच्या दुकानात शिरलेल्या नागाला (इंडियन कोब्रा) सर्पमित्र राहुल तारवी याने जीवदान दिले. रविवारी (ता. २) सकाळी अकराच्या सुमारास जव्हार फाट्यावरील भंगाराच्या दुकानात विषारी नाग शिरला होता. त्याने घुशीची शिकार करून घुशीला गिळण्याच्या तयारीत होता. याचवेळी भंगार दुकानमालकाने सावरखंड गावातील सर्पमित्र राहुल तारवी याला बोलावून घेतले. सर्पमित्र राहुल याने दुकानात शिरलेल्या नागाला पकडून टाकमा देवी मंदिरालगतच्या जंगलात सोडून दिले.