कल्याणमध्ये भाजपातर्फे स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये भाजपातर्फे स्वच्छता अभियान
कल्याणमध्ये भाजपातर्फे स्वच्छता अभियान

कल्याणमध्ये भाजपातर्फे स्वच्छता अभियान

sakal_logo
By

कल्याण, ता. ३ (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारनाका येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम येथे सेवा पंधरवडा अभियानांतर्गत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला.
कल्याण पश्चिममधील पारनाका येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून अभियानाला सुरुवात केली. स्वच्छता अभियानाला खऱ्या अर्थाने गती आली ती पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत धोरणांमुळे. म्हणूनच भाजपाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले असल्याचे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. या अभियानात कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार याही सहभागी झाल्या होत्या.
यावेळी भाजपा कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, वॉर्ड क्र. ३२ चे अध्यक्ष महेश केळकर, वॉर्ड क्र. ३२ च्या महिला मोर्चा अध्यक्षा समृद्धी देशपांडे, कल्याण शहर सचिव श्रीधर जोशी, ओबीसी मोर्चा शहर सरचिटणीस महेश चौधरी, महिला मोर्चा शहर सरचिटणीस स्नेहल सोपारकर मॅडम, नितीन पोडवाल, श्रीधर देवस्थळी, मकरंद ताम्हणे, स्वानंद कटिकर, अनिल बोरनारे, रवी गुप्ता, प्रताप टुमकर, नवनाथ पाटील, सुधीर भगत, राजन पाटील, राजेश रजक, स्वप्निल निमसे, स्वच्छ भारत अभियानचे सहसंयोजक मृत्युंजय शुक्ला, भरत पाटील, सुरेश कानोजिया, वीरेंद्र मुथा, शबाना शेख, मिलिंद सिंह तसेच परिसरातील नागरिक, व्यापारी वर्ग व कार्यकर्ते सहभागी झाले होते.