कुणबी समाजसेवा संस्था कार्यकरिणी जाहिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणबी समाजसेवा संस्था कार्यकरिणी जाहिर
कुणबी समाजसेवा संस्था कार्यकरिणी जाहिर

कुणबी समाजसेवा संस्था कार्यकरिणी जाहिर

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : कुणबी समाजसेवा संस्था ठाणे-पालघर जिल्हा या संस्थेच्या २०१८ ते २०२२ या त्रैवार्षिक संचालक मंडळाचा कार्यकाल नुकताच संपुष्टात आला. यामुळे २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळाची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून चंद्रकांत रघुनाथ लाटे, उपाध्यक्ष म्हणून भिवंडी बाजार समितीचे सभापती देविदास पाटील यांची निवड करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांतील कुणबी बांधवांना सहकार्य व्हावे म्हणून नरेंद्र शेलार तसेच मोहन सोनावणे यांचीसुद्धा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. खजिनदारपदी शाम कोरडे तर सचिवपदी निवृत्त शिक्षक एस. एल. पाटील यांची निवड करण्यात आली. सहाय्यक सचिव म्हणून संतोष कडव व गुरुनाथ पष्टे यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून दत्तात्रय पठारे, शोभना जाधव, अरुणा सांबरे यांची निवड करण्यात आली.