रौप्य पदकप्राप्त मानसी पवारचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रौप्य पदकप्राप्त मानसी पवारचा सन्मान
रौप्य पदकप्राप्त मानसी पवारचा सन्मान

रौप्य पदकप्राप्त मानसी पवारचा सन्मान

sakal_logo
By

बदलापूर, ता. ३ (बातमीदार) ः बदलापुरात विविध राजकीय पुढाऱ्यांनी नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. तरुणाईने देखील यावेळी उत्सवाला मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला आहे. याच पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व चैतन्य संकुल येथे शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख वामन म्हात्रे आयोजित नवरात्रोत्सवात रविवारी (ता. २) बदलापूर शहरातील मानसी पवार या तरुणीने रग्बी खेळात राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक मिळवल्याने तिचा यावेळी सन्मान करण्यात आला.
शिंदे गटातील शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आयोजित नवरात्रोत्सवात देखील महिलांचा भोंडला, पारंपरिक खेळ, गाणी असे कार्यक्रम घेत, शहरात विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या महिलांचं कौतुक देखील या ठिकाणी करण्यात येत आहे. बदलापूर पूर्व परिसरात राहणाऱ्या मानसी पवार या २१ वर्षीय तरुणीने राष्ट्रीय स्तरावर रग्बी या खेळात रौप्यपदक कमवून बदलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल माजी नगरसेविका विणा म्हात्रे तसेच माजी नगराध्यक्षा उषा म्हात्रे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी विणा म्हात्रे यांनी मानसी पवारसारख्या तरुणी याच खऱ्या आधुनिक दुर्गा असल्याचे सांगत तिचे कौतुक केले.