गरबा खेळू न दिल्याने टोळक्याकडून दोघांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरबा खेळू न दिल्याने टोळक्याकडून दोघांना मारहाण
गरबा खेळू न दिल्याने टोळक्याकडून दोघांना मारहाण

गरबा खेळू न दिल्याने टोळक्याकडून दोघांना मारहाण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः कल्याण-शिळ रोडवरील निळजे गावातील लोढा हेवन गोकुळधाम सोसायटीतील दोघा तरुणांना गरब्यावरून झालेल्या भांडणानंतर एका टोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात रोशन लोखंडे, आकाश सिंग, अविनाश कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणारे सचिन कोतकर यांनी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार शनिवारी रात्री सचिन हे सोसायटीतील रहिवाशांसह सोसायटी आवारात गरबा खेळत होते. याच सोसायटीत राहणारा आकाश सिंग व त्याचा मित्र रोशन लोखंडे यांना यापूर्वी सोसायटीतील रहिवाशांनी गरबा खेळण्यास मनाई केली होती. याचा राग मनात असल्याने आकाश व रोशनने त्यांचे मित्र अविनाश कांबळे व जगदीश यांना सोबत आणून रहिवाशांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आकाशने लाकडी बांबूने अमन जामदार याच्या डोक्यात मारले, तर रोशनने सचिन यांना मारहाण केली. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याने सचिन यांनी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.