आगीत होरपळलेल्या मायलेकींचा अंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगीत होरपळलेल्या मायलेकींचा अंत
आगीत होरपळलेल्या मायलेकींचा अंत

आगीत होरपळलेल्या मायलेकींचा अंत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः अनैतिक संबंधांच्या वादातून पतीने आपल्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याची घटना शनिवारी पहाटे भोपर परिसरात घडली होती. या दुर्घटनेत आईचा रविवारी तर दोन्ही मुलींचा सोमवारी सकाळी अंत झाला. आगीत होरपळलेल्या मायलेकी मृत्यूशी झुंज देत होत्या. परंतु आईनंतर दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून प्रसाद पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास पूर्वेतील भोपर गावात एका घराला आग लागून त्यामध्ये एका महिलेसह दोन मुली आणि एक पुरुष होरपळल्याची घटना घडली होती. या आगीत प्रसाद पाटील (वय ४०) यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रीती (वय ३५) व मुली समीरा (वय १३) व समीक्षा (वय ११) या होरपळल्या होत्या. घराला आग लागल्याचा बनाव प्रथम करण्यात आला होता. मात्र आता या घटनेला वेगळी कलाटणी मिळाली असून अनैतिक संबंधातूनच पतीने पत्नीसह दोन मुलींना जीवे ठार मारले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील प्रीतीचा रविवारी तर दोन्ही मुलींचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी प्रीतीचा भाऊ किशोर पाटील यांनी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रसादविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
...
चिमुकल्यांचे ते बोल खरे ठरले!
प्रीतीच्या माहेरचे जेव्हा तिच्या घरी प्रसादसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. त्या वेळी, ‘आम्हाला लवकरात लवकर येथून घेऊन चला, नाहीतर पप्पा आम्हाला जीवे ठार मारतील,’ असे दोन्ही मुलींनी सांगितले होते. चिमुकल्यांचे हे बोल खरे ठरले.