१ कोटीच्या सोन्यासह ५६ लाखांची रक्कम जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१ कोटीच्या सोन्यासह ५६ लाखांची रक्कम जप्त
१ कोटीच्या सोन्यासह ५६ लाखांची रक्कम जप्त

१ कोटीच्या सोन्यासह ५६ लाखांची रक्कम जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः चालत्या पुष्पक एक्स्प्रेसमधून टिटवाळा रेल्वे स्थानकात उतरलेल्या इसमास आरपीएफने ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्या बॅगमध्ये तब्बल १ कोटी ७१ लाखाचे सोने व ५६ रोख रक्कम असा मुद्देमाल आढळून आला. जीपी मोंडल असे या व्यक्तीचे नाव असून लखनऊ येथून त्याने व्यापारासाठी हा माल आणला असल्याचे सांगितले. मात्र त्याच्याजवळ कोणतीही कागदपत्रे आढळून आली नसल्याने रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत आयकर विभागाकडे पुढील तपास पाठविला आहे.
पुष्पक एक्सप्रेस टिटवाळा रेल्वे स्थानकातून १ ऑक्टोबरला जात असताना गाडीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत एक व्यक्ती स्थानकात उतरली. त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रेल्वे आरपीएफ कर्मचारी हेड कॉन्स्टेबल एल. बी. वाघ आणि एमएसएफ कर्मचारी शुभम खरे यांनी त्याला ताब्यात घेतले. रेल्वे आरपीएफ महिला इन्स्पेक्टर अंजनी बाबर यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने आपले नाव जीपी मोंडल असून नवी मुंबई कामोठे येथे राहणार असल्याचे सांगितले. तो सोन्याचा व्यापार करतो आणि लखनऊ येथून तो आला होता. त्याच्या बॅगेत ५६ लाखांची रक्कम व १ कोटी १५ लाखाचे सोने आढळून आले. रेल्वे पोलिस व आयकर विभाग अधिक तपास करीत आहेत.