पालिकेकडून मालमत्ता कर देयके जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेकडून मालमत्ता कर देयके जाहीर
पालिकेकडून मालमत्ता कर देयके जाहीर

पालिकेकडून मालमत्ता कर देयके जाहीर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ ची मालमत्ता कर देयके जाहीर करण्यात आली आहेत. पालिकेच्या संकेतस्थळावर ही देयके उपलब्ध आहेत. ही देयके करदात्यांना ई-मेल, एसएमएस आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारेही पाठवली जात आहेत. करदात्यांनी ऑनलाईन सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, एसबीआय ई-पे या पेमेंट गेटवेच्या निःशुल्क सेवेचा व सिटी बँक पेमेंट गेटवे सेवा आदींचा उपयोग करून मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणार आहे.