नव्या परिवहन आयुक्तांपुढे विविध कामे मार्गी लावण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या परिवहन आयुक्तांपुढे 
विविध कामे मार्गी लावण्याचे आव्हान
नव्या परिवहन आयुक्तांपुढे विविध कामे मार्गी लावण्याचे आव्हान

नव्या परिवहन आयुक्तांपुढे विविध कामे मार्गी लावण्याचे आव्हान

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ ः ओव्हरलोड वाहतूक, अवैध प्रवासी सेवा, परिवहन विभागातील फेसलेस सेवांमधील त्रुटी, तसेच ॲपआधारित टॅक्सीमधील पॅनिक बटनसाठी परिवहन विभागाचे नियंत्रण कक्ष उभारणी आदी विविध कामांच्या अंमलबजावणीचे आव्हान नवे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यापुढे आहे. भिवनमार यांनी नुकतीच तत्कालीन परिवहन आयुक्तांकडून पदभार स्वीकारला.
विवेक भिमनवार यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. सद्यस्थितीत परिवहन विभागाचे अनेक प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यांची मान्यता मिळवत संबंधित कामांना दिशा देण्याचे आव्हान आयुक्तांपुढे असणार आहे. त्यामध्ये ५० आरटीओ, भरारी पथक, सीमा तपासणी नाके, टॅक्सवसुली, वाहन नोंदणीचे राज्यभरातील कामकाजावर परिवहन आयुक्तांना नजर ठेवावी लागणार आहे. त्याशिवाय केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून विविध आदेशांची अंमलबजावणी, टॅक्सी रिक्षा परमीट बंदीचे धोरण, टॅक्सी रिक्षांवर रूफ लाईट, सीमा तपासणी नाके बंद करण्यासंदर्भात असे अनेक प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्याशिवाय परिवहन विभागाच्या ऑनलाईन वाहन संकेतस्थळामध्ये त्रुटी असल्याने जुन्या बीएस फोर वाहनांची मागील तारखेत नोंदणी केल्याचे प्रकार पुढे आले. त्यातही सुधारणा करण्याचे आव्हान नवे आयुक्त भिमनवार यांच्यापुढे असणार आहे.