पेण वाचनालयात गांधी जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेण वाचनालयात गांधी जयंती साजरी
पेण वाचनालयात गांधी जयंती साजरी

पेण वाचनालयात गांधी जयंती साजरी

sakal_logo
By

पेण, ता. ३ (बातमीदार) : येथील महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयात महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती सादरी करण्यात आली. वाचनालयाचे संचालक जनार्दन आठवले यांनी लोकमान्य टिळक आणि उपाध्यक्ष सपना पाटील यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास हार घातला. त्यानंतर संचालक अनधा सावंत यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला. १८५७ पासून १९४२ पर्यंत अनेक क्रांतिकारक, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु इंग्रजांनी काही क्रांतिकारकांना ठार मारले. हे पाहून महात्मा गांधीनी अहिंसेच्या मार्गाने स्वराज्य मिळवण्याचा प्रयत्न केला. १९४२ मध्ये चले जाव चळवळ सुरू केली आणि १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे महात्मा गांधींचा मार्ग हा महत्त्वाचा ठरला, असे अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ गांधीवादी नेते व संत वाङ्‍मय याचे गाढे अभ्यासक संस्थेचे अध्यक्ष अरविंद वनगे यांनी सोदाहरण स्पष्ट केले.