ड्राय डे असतानाही मद्याची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ड्राय डे असतानाही मद्याची विक्री
ड्राय डे असतानाही मद्याची विक्री

ड्राय डे असतानाही मद्याची विक्री

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : गांधी जयंतीनिमित्त रविवारी ड्राय डे असतानाही खुलेआम दारूची विक्री सुरू असलेल्या कोपरखैरणे सेक्टर -१८ मधील क्लासिक रेस्टॉरंट अँड बारवर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने रविवारी रात्री छापा मारून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने मद्याची विक्री करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने रवीवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणेतील क्लासिक रेस्टॉरंट अँड बारवर छापा मारला. या वेळी अमोल अंनंदा अटोगळे (वय ३०), रोहित मोहन शेट्टी (वय ३९), मुन्ना मयूर कुतुबुद्दीन वलीम शेख (वय २५), सद्दाम शमशादअली शेख (वय १९) हे दोघे बेकायदा मद्य विक्री करताना आढळून आले. गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर या नोटीस बजावून सोडून दिले.