केशवसृष्टीच्या इतिहासाचा उलगडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशवसृष्टीच्या इतिहासाचा उलगडा
केशवसृष्टीच्या इतिहासाचा उलगडा

केशवसृष्टीच्या इतिहासाचा उलगडा

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३ : भाईंदरच्या केशव सृष्टी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी राज्यातील विविध सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा १३वा केशव सृष्टी पुरस्कार अकोल्याच्या एकविरा मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या संचालिका सुचिता बनसोड यांना प्रदान करण्यात आला. यावेळी केशवसृष्टीचा तब्बल ४० वर्षांचा इतिहास आणि विकासयात्रा सांगणाऱ्या चित्रफीतीचे प्रस्तूतीकरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह अरूण कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सुचिता बनसोड यांनी कर्णबधीर मुलांसाठी विविध सॉफ्टवेअरचा उपयोग करून त्यांना इतर सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेण्यास सज्ज केले आहे. हे काम त्या गेल्या १५ वर्षांपासून करत आहेत. आजपर्यंत हजारो कर्णबधिर मुलांना त्यांनी शिक्षण दिले. केवळ अपंग मुलांनाच प्रशिक्षण देऊन न थांबता त्यांनी त्यांच्या मातांनाही प्रशिक्षित केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन १३ वा केशव सृष्टी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे या निवड समितीत सर्व महिलांचा समावेश होता.

संघाचे सहकार्यवाह अरुण कुमार यांनी मार्गदर्शन करताना सुचेता बनसोड यांनी आपल्यासारख्या अन्य पीडितांचाही विचार केल्याचे नमूद करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. असे सेवाभावी कार्यकर्ते पुरस्कारासाठी नाही तर स्वांत सुखाय कर्तव्य भावनेतून करतात, अशी त्यांनी पुस्तीही जोडली.


केशव सृष्टी पुरस्कार प्राप्त केलेल्यांच्या कहाण्या २५-३० वर्षे वयोगटाच्या देशातील अधिकाधिक तरुणांपर्यंत प्रेरणा स्वरूपाने पोहोचवल्या पाहिजेत. १३० कोटी लोकसंख्येच्या या विशाल देशात आव्हानेदेखील खूप आहेत; मात्र सुचिता ताईंसारख्या सेवाभावी समर्पित व्यक्तींच्या प्रेरणेने अपेक्षित परिवर्तन लवकर होईल.
- अरूण कुमार सह कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ