कॅलेक्स केमिकलच्या कामगारांना पगारवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅलेक्स केमिकलच्या कामगारांना पगारवाढ
कॅलेक्स केमिकलच्या कामगारांना पगारवाढ

कॅलेक्स केमिकलच्या कामगारांना पगारवाढ

sakal_logo
By

मनोर, ता. ४ (बातमीदार) : तारापूर औद्योगिक वसाहतीतील कॅलेक्स केमिकल ॲण्ड फार्मास्युटिकल कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीचा करार करण्यात आला आहे. कामगारांच्या पगारवाढीसाठी गेल्या वर्षभरापासून श्रमिक उत्कर्ष सभा ही कामगार संघटना प्रयत्नशील होती. श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात कॅलेक्स केमिकल ॲण्ड फार्मास्युटिकल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खंडू वरल, संचालक वसंत जैन, विनोद किरजत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीतील कामगारांच्या वेतनात पाच वर्षांसाठी सोळा हजारांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पगारवाढीमुळे कामगारांना ४८ हजारांपर्यंत वेतन मिळणार आहे. पगारवाढीचा करार झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्रमिक उत्कर्ष सभेचे सचिव भालचंद्र साळवी, महेश सावंत, कॅलेक्स कामगार समितीचे प्रशांत वडे, संतोष संखे, दीपक पाटील, महेश पाटील आणि नितीन लोखंडे यांचे कामगारांनी आभार मानले.