ठाण्यातील मातृसेवा फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील मातृसेवा फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम
ठाण्यातील मातृसेवा फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

ठाण्यातील मातृसेवा फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

sakal_logo
By

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : नवरात्रोत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. मात्र देहविक्री करणाऱ्या महिला या सणापासून कोसो दूर असल्याने या महिलांनादेखील नवरात्रोत्सव साजरा करता यावा, या उद्देशाने ठाणे येथील मातृसेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत शनिवारी नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी येथील महिलांना गरबा व विविध खेळ शिकविण्यात आले. तसेच संस्थेच्या माध्यमातून त्यांना साड्या व धान्याचेदेखील वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी समाजसेविका डॉ. स्वाती सिंह, मातृसेवा फाऊंडेशन सामाजिक संस्थेच्या संस्थापिका संध्या सावंत यांच्यासह संस्थेच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.