तपासांती पतीविरोधात हत्येचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तपासांती पतीविरोधात हत्येचा गुन्हा
तपासांती पतीविरोधात हत्येचा गुन्हा

तपासांती पतीविरोधात हत्येचा गुन्हा

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ४ (बातमीदार) ः गोवंडीच्या बैगन वाडीमधील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये काही दिवसांपूर्वी (ता. २९ जुलै) एकाच कुटुंबातील चौघे मृतावस्थेत आढळले होते. त्यामध्ये पती शकील खान, पत्नी रजिया, मुलगा सरफराज व मुलगी अतिका यांचे मृतदेह सापडले होते. शकीलने तिघांना विष देऊन नंतर आत्महत्या केल्याचा निष्कर्ष तपासाअंती निघाला आहे. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्याविरोधात रविवारी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. गोवंडी परिसरात शकीलचे सुपारीचे दुकान आहे. तो व त्याचा भाऊ हा व्यवसाय करत होते; परंतु जुलै महिन्यात त्याच्यासह बायको व मुलांचे मृतदेह राहत्या घरात आढळल्यामुळे खळबळ माजली होती. शकीलची पत्नी त्या वेळी गरोदर असल्याचेदेखील समोर आले होते. शकील कर्जबाजारी झाल्यामुळे नैराश्यात त्याने शीतपेयातून बायको व मुलांना विष देऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर पत्नीच्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करत स्वतःचे जीवन संपवल्याचा निष्कर्ष शिवाजीनगर पोलिसांच्या तपासात समोर आला. त्यानुसार रविवारी शकीलविरोधात हत्येचा गुन्हा शिवाजीनगर पोलिसांनी नोंदवला.