सायकली चोरी करणाऱ्या आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकली चोरी करणाऱ्या आरोपींना अटक
सायकली चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

सायकली चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

sakal_logo
By

पालघर, ता. ४ (बातमीदार) : सफाळे पोलिसांनी सायकली चोरणाऱ्या चार आरोपींना अटक करून तेरा सायकली हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी ज्यांच्या सायकली चोरीस गेल्या असतील, सफाळे पोलिस ठाण्याची संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
सफाळे माकणे, येथील अनिता भालेराव यांची सफाळ्यामधील देवभूमी कॉम्प्लेक्स सायकल चोरीस गेली होती. याबाबत त्यांनी सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची उकल करताना सफाळे पोलिसांनी बोईसर येथील चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी सफाळे परिसरातील १३ सायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक लाख २८ हजार रुपये किमतीच्या तेरा सायकली हस्तगत केल्या आहेत.