पडघा येथील गिरीराज पतसंस्थेची वार्षिक सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडघा येथील गिरीराज पतसंस्थेची वार्षिक सभा
पडघा येथील गिरीराज पतसंस्थेची वार्षिक सभा

पडघा येथील गिरीराज पतसंस्थेची वार्षिक सभा

sakal_logo
By

पडघा, दि. ३ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील पडघा येथील नागरिकांना पतपुरवठा करण्यासाठी अग्रेसर असलेल्या गिरीराज पतसंस्थेची वार्षिक सभा पार पडली. गिरीराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा अध्यक्ष अमोल बिडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सन २०२१-२०२२ चे ताळेबंदपत्रक, नफा-तोटा, लाभांश जाहीर करणे, ऑडीट रीपोर्टची नोंद घेणे, २०२२-२०२३ सालच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे तसेच वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणेबाबत वाचन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष गिरीश पटेल, संचालक अमीत बिडवी, प्रवीण बिडवी, ॲड. अजित कराडकर, रावसाहेब कुमावत, संजय जाधव, स्नेहा तांबोळी, आकांक्षा पातकर ॲड. प्रदीप मते, सेक्रेटरी दिनेश गंधे, व्यवस्थापक अनीकेत काळे उपस्थित होते.